वांग्याचे भरीत / Vangyache Bharit
Aajcha bet recipes च्या आजच्या लेखामध्ये चमचमीत असं वांग्याचे भरीत कसं करायचं याची रेसीपी दिली आहे. वांग्याचे भरीत हा एक अस्सल मराठमोळा खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात तो वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो. काही भागात वांग भाजून त्यात कच्चे तेल, तिखट, मीठ घालून तसेच खाल्ले जाते. तर काही भागात म्हणजे जळगाव कडे भरपूर तेलाचा वापर करून भरीत बनवले जाते. भरीता साठी लागणारी वांगी ही आकाराने मोठी व काळपट किंवा हिरव्या रंगाची असतात. वांग्याचे भरीत, गरमागरम भाकरी, मिरचीचा ठेचा आणि कांदा हा मेन्यू म्हणजे अगदी स्वर्ग सुखच....
हे ऐकून बहुतेक सगळ्यांना सिंहगडावरील वांग्याचे भरीत आठवलं असेल. सिंहगडाची सैर करून आल्यावर प्रत्येक जण या थाळीचा नक्कीच आस्वाद घेत असाल. याच चवीचं Vangyache Bharit घरीच कसं करता येईल याची अगदी सोपी रेसिपी मी आपल्यासाठी देत आहे.
![]() |
| वांग्याचे भरीत / Vangyache Bharit |
साहित्य :-
४/५ हिरवट काटेरी वांगी
१ मोठा कांदा
१ टोमॅटो
१ चमचा मोहरी
१ चमचा जिरे
७/८ कढीपत्त्याची पाने
पाव चमचा हळद
१चमचा कांदा लसूण मसाला
१ चमचा गरम मसाला
चिमुटभर हिंग
कोथिंबीर
मीठ व तेल
ही रेसीपी सुदधा नक्की करून पहा :- जीत वडा रस्सा भाजी / Jitvada rassa bhaji recipe
कृती :-
- वांगी स्वच्छ धुऊन व पुसून घ्या. वांग्याचे देठ व काटे कापून घ्या. वांग्याला मधोमध उभे चिर देऊन घ्या.
- वांगी उकळत्या तेलात घाला. मध्यम गॅसवर तळून घ्या. वांग्याची साल सुरकतली गेली पाहिजे. जास्त काळी करू नये. वांगी सर्व बाजूंनी छान तळली गेली पाहिजे.
- वांगी बाजूला काढून त्याच तेलात कांदा उभा पातळ चिरून तांबूस रंगावर तळून घ्या.
- कांदा काढून तेल काढून घ्या. भाजीसाठी लागेल तेवढे तेल कढईत ठेवून तेलात मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग घालून परता. बारीक चिरलेला टोमॅटो घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवा.
- तळलेला कांदा, हळद, कांदा लसूण मसाला, गरम मसाला घालून व्यवस्थित परता.
- सर्व मसाले परतले गेले की, वरून तळलेली वांगी कुस्करून घाला. चवीनुसार मीठ घाला. व्यवस्थित परतून घ्या. वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करा.
अशाप्रकारे तयार आहे झणझणीत असं वांग्याचं भरीत... हे भरीत तुम्ही गरमागरम ज्वारीची/बाजरीची भाकरी किंवा चपातीबरोबर खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा व मैत्रिणींसोबत शेअर करा.
धन्यवाद 🙏
श्री स्वामी समर्थ

0 टिप्पण्या