आजकाल भाज्यांचे दर जास्त असल्यामुळे कमी खर्चात, पोटभरीची आणि चवदार भाजी बनवणे अनेकांना कठीण जाते. अशा वेळी ग्रामीण महाराष्ट्रात केली जाणारी जीत वडा रस्सा भाजी ही एक उत्तम पारंपारिक रेसिपी आहे. अचानक पाहुणे आले असतील किंवा घरात भाजी नसेल, तर हरभरा डाळीपासून बनणारी ही झणझणीत वाटल्या डाळीच्या भज्यांची आमटी पटकन तयार करता येते.
पूर्वीच्या काळात बाजारात भाज्या सहज उपलब्ध नसत. त्यामुळे घरी असलेल्या डाळी, कडधान्ये आणि मसाल्यांचा वापर करून अशा चवदार रस्सा भाज्या केल्या जात. त्यातूनच जीत वडा रस्सा भाजी अस्तित्वात आली असावी. आजही ही रेसिपी गावरान जेवणात खास मानली जाते.
माझ्या आईकडून मी ही रेसिपी शिकले असून, तिच्या हातची चव अप्रतिम असते. अगदी तशीच चव मिळवण्याचा मी प्रयत्न केला आहे. आज या लेखामध्ये तुम्हाला Jitvada Rassa Bhaji Recipe सोप्या पद्धतीने, टिप्ससह सांगत आहे.
![]() |
| गावरान चवीची झणझणीत जीत वडा रस्सा भाजी |
साहित्य :-(जीत वड्यासाठी/भज्यांसाठी)
- १ मोठी वाटी हरभरा डाळ
- ७/८ लसूण पाकळ्या
- १ चमचा जिरे
- ३/४ हिरव्या मिरच्या
- मीठ व हळद
- तेल तळण्यासाठी
साहित्य :-(रस्सा करण्यासाठी)
- १ मोठा कांदा (उभा पातळ चिरलेला)
- पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे काप
- ६/७ लसूण पाकळ्या
- आलं
- कोथिंबीर
- जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता
- १ चमचा मिरची पावडर
- १ चमचा गोडा मसाला
- २ चमचे घरगुती कांदा मसाला
- मीठ, तेल व गरम पाणी
ही रेसीपी सुद्धा करून पहा :- मिसळ कशी बनवायची ?
कृती :-(step by step)
1️⃣ जीत वडे तयार करणे
2️⃣ भजी तळणे
3️⃣ मसाल्याचे वाटण
4️⃣ रस्सा तयार करणे
5️⃣ आमटी शिजवणे
सर्व्हिंग -
तयार आहे झणझणीत जीत वडा रस्सा भाजी. ही भाजी भात, ज्वारी-बाजरीची भाकरी किंवा पोळी सोबत खूपच छान लागते.
काही उपयुक्त सुगरण टिप्स -
- डाळ शक्यतो पाटा-वरवंट्यावर वाटल्यास चव अधिक छान येते.
- भजी लहान केल्यास आतपर्यंत व्यवस्थित तळली जातात.
- रस्सा दाटसर करण्यासाठी डाळीचे मिश्रण नक्की वापरा.
- गरम पाणी वापरल्याने रंग व चव टिकून राहते.
- अधिक झणझणीत चव हवी असल्यास थोडा चिकन/मटन मसाला वापरू शकता.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न - (FAQ)
१) जीत वडा रस्सा भाजी किती दिवस टिकते?
- ही भाजी ताजी असतानाच खाल्ली तर चव उत्तम लागतेफ्रिजमध्ये ठेवली तर १ दिवस चांगली टिकते.
२) ही भाजी हेल्दी आहे का?
- होय, डाळीपासून बनल्यामुळे प्रथिनयुक्त व पोटभरीची आहे.
३) जीत वडा रस्सा भाजी किती वेळात तयार होते?
ही रेसिपी साधारणतः ३० ते ४० मिनिटांत तयार होते. डाळ आधी भिजवलेली असल्यास वेळ कमी लागतो.
अशीच गावरान चवीची भाजी रेसीपी पहा - हुलग्याचे शेंगोळे
सध्या भाज्या महाग आहेत. त्यामुळे अगदी स्वस्तात मस्त अशी ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा. आवडल्यास मैत्रिणींसोबत शेअर करा.
धन्यवाद 🙏
श्री स्वामी समर्थ

0 टिप्पण्या