बेसन ढोकळा / How to Make dhokla
Aajcha bet च्या या लेखामध्ये मार्केटमध्ये मिळतो तसा बेसन ढोकळा घरीच कसा करायचा याची रेसीपी देत आहे.सुट्टीच्या दिवशी घरी नाश्ता काय बनवावा असा प्रश्न अनेकांना पडतो . त्यातच नेहमी तेच तेच पदार्थ करायला आणि खायला देखील कंटाळा येतो. अशा वेळी वेगळे काहीतरी ट्राय करावे असे प्रत्येक गृहिणीला वाटत असत. मग मोबाइलवर वेगवेगळ्या नाश्ता रेसिपीस सर्च केल्या जातात. अशीच एक गुजराती रेसिपी म्हणजे आंबट गोड बेसन ढोकळा .
गुजराती पदार्थांमध्ये सर्वात मानाचे स्थान कोणाला ? .... तर ते ढोकळ्याला ! आंबट गोड बेसन ढोकळा हि एक पारंपरिक आणि अतिशय अशी लोकप्रिय डिश आहे. मिठाईच्या दुकानात तर हमखास हा ढोकळा विकायला असतोच असतो. रेसिपी कितीही बघून केली तरी बऱ्याचदा फसते. मग तो पुन्हा केला जात नाही. मी स्वतः सुद्धा अनेकदा हि रेसिपी करताना फसली आहे. पण आता मी तो अगदी छान बनवते.
![]() |
| How to Make dhokla |
साहित्य :- (२५० ग्रॅम ढोकळ्यासाठी)
१५० ग्रॅम (दिड वाटी) - बेसन४ चमचे - साखर
१ चमचा - मीठ
१/२ चमचा - लिंबू सत्व (CITRIC ACID)
चिमूठभर हळद
१/२ चमचा खायचा सोडा
हिरव्या चटणीसाठी साहित्य :-
ढोकळ्याचे २-३ तुकडे कोथिंबीर व पुदिन्याची ६/७ पाने
२ हिरव्या मिरच्या
आल्याचा छोटा तुकडा
१ चमचा मोहरी
१ चमचा पांढरे तीळ
२ - ३ हिरव्या मिरच्या
७ - ८ कढीपत्त्याची पाने
पाव चमचा हिंग
साखर (चवीनुसार)
१ कप पाणी
डेकोरेशनसाठी - ओल्या खोबऱ्याचा किस व कोथिंबीर
- बेसन चाळून घ्या. त्यात साखर, मीठ, लिंबू सत्व (CITRIC ACID), चिमूटभर हळद घालून एकत्र करा.
- थोडे थोडे पाणी घालून गुठळ्या मोडत मिश्रण एकजीव करा. हाताने फेटत मिश्रण ५ मिनिटे तरी एकजीव करा. सैलसर असे मिश्रण झाले पाहिजे. अर्धा तास मिश्रण झाकून ठेवा.
- गॅसवर मोठ्या कढईत किंवा पातेल्यात पाणी उकळायला ठेवा. त्यात स्टॅन्ड ठेवा. त्या कढईत बसेल असे पसरट भांडे किंवा ताट घेऊन त्याला तेल लावून घ्या.
- एकीकडे फोडणीच्या डावात तेल गरम करून त्यात मोहरी, मिरच्यांचे तुकडे, हिंग, कढीपत्ता, तीळ घालून खमंग फोडणी तयार करावी. त्यात एक कप पाणी य चमचाभर साखर घालून फोडणीला उकळी आणावी. व गॅस बंद करून फोडणी थंड करावी.
- झाकून ठेवलेले मिश्रण पुन्हा एकदा फेटून घ्या. कढईतले पाणी उकळले कि मिश्रणात सोडा घाला त्यावर एक चमचा पाणी टाकून तो सोडा मिश्रणात एकजीव होईपर्यंत चांगले फेटून घ्या. (हि क्रिया फास्ट करा).
- तयार मिश्रण पटकन ताटात ओतून ते ताट गॅसवरील कढईत स्टॅण्डवर ठेवा व वरून घट्ट झाकण लावा.
- ढोकळा माध्यम आचेवर १५ मिनिटे वाफवून घ्या. गॅस बंद करून ढोकळा थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडा.
- तयार फोडणी ढोकळ्यावर घालून वरून खोबऱ्याचा किस व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ढोकळा सजवा.
ढोकळ्याचे राहिलेले बारीक तुकडे मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात कोथिंबीर, पुदिन्याची पाने, हिरवी मिरची, मीठ, आले, जिरे, चवीनुसार साखर व पाणी घालून पातळसर चटणी वाटून घ्या. अगदी मार्केटसारखी चटणी तयार होते.
काही सुगरण टिप्स :-
- शक्यतो बाजारात मिळणारे हिरा बेसन वापरल्यास ढोकळा हलका व जाळीदार होतो.
- बेसन चाळून घेतल्यास गुठळया होत नाही. व मिश्रण अगदी छान बनते.
- ढोकळ्याचे मिश्रण फार पातळ नसावे किंवा फार घट्ट नसावे. कारण मिश्रण पातळ झाल्यास ढोकळा आतून कच्चा राहतो व मिश्रण घट्ट झाल्यास ढोकळा घशात अडकलल्यासारखा होतो.
- मिश्रण अर्धा तास तरी झाकून ठेवावे. त्यामुळे सर्व पदार्थाची चव मिळून येते.
- कधी कधी ढोकळा लालसर होतो. याचे कारण मिश्रण एकजीव झालेले नसते. म्हणजेच हळद व सोडा नीट न मिसळल्यामुळे त्याची REACTION होते. व ढोकळा लालसर दिसतो.
- फार जुना सोडा वापरल्यास सोडा ऍक्टिव्ह होत नाही व ढोकळा मऊ व जाळीदार होत नाही. म्हणून शक्यतो खायचा सोडा नवीन वापरावा.
- सोडा हा फार आधी घालू नये. अगदी आयत्यावेळेस म्हणजे कढईतील पाणी उकळले कि मिश्रण ताटात ओतण्याआधी घालावा.
- फोडणी हि फार गरम कधी घालू नये. ती कोमट किंवा थंड असावी.
अशा प्रकारे मार्केट सारखा ढोकळा तुम्ही घरी बनवू शकता. हि रेसिपी नक्की TRY करा व मैत्रिणीसोबत SHARE करा.
धन्यवाद !
श्री स्वामी समर्थ

0 टिप्पण्या