पास्ता / How to make white sauce pasta
Aajcha bet recipes च्या आजच्या लेखामध्ये लहान मुलांना आवडणारा पास्ता घरी कसा करायचा ते पाहूया.चायनीज पदार्थांबरोबरच इटालियन पदार्थांची सुद्धा मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. लहानांपासून मोठ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे पिझ्झा आणि पास्ता... यातलाच पास्ता अनेकांच्या पसंतीस पडणारा पदार्थ आहे. पास्त्याचे दोन प्रकार आहेत .एक म्हणजे रेड सॉस पास्ता आणि दुसरा व्हाईट सॉस पास्ता...या पदार्थांची किंमतही खिशाला न परवडणारी असते. असे पदार्थ रेस्टॉरंट मध्ये जाऊन खाणे प्रत्येक वेळी शक्य होत नाही... लहान मुलांची डिमांड पूर्ण करण्यासाठी प्रत्येक आईला याची रेसिपी शिकून घेणे गरजेचे वाटेल.
यामध्ये कोणतीही आवडणारी भाजी व भरपूर सारे चीज घालून ही रेसिपी केली तर नक्कीच पौष्टिक असा नाश्ता होऊ शकतो. जो मुलांची किंवा मोठ्यांची संध्याकाळची छोटी भूक भागवू शकतो. चला तर मग ही How to make white sauce pasta रेसिपी अगदी घरच्या साहित्यात कशी करायची ते मी सांगणार आहे.
![]() |
| How to make white sauce pasta |
साहित्य :-
१५० ग्रॅम पास्ता
५० ग्रॅम मैदा
५० ग्रॅम बटर
४०० मिली दूध
आवडीनुसार भाज्या (गाजर, सिमला मिरची, कांदा, स्वीट कॉर्न)
१ चमचा काळीमिरीपूड
१ चमचा बारीक चिरलेला लसूण
१ चमचा चिली फ्लेक्स
१ चमचा ओरिगानो
चीज क्यूब / मेयोनीज
मीठ, तेल व पाणी आवश्यकतेनुसार
ही रेसीपी सुद्धा नक्की करून पहा :- व्हेज मंचुरियन / Veg Manchurian recipe in marathi
कृती :-
- पास्ता साठी लागणारा पास्ता हा बाजारात विविध नावांनी ओळखला जातो. त्यातलाच इथं मी पेने पास्ता(रव्यापासून बनवलेला) घेतला आहे.एका पातेल्यात पाणी उकळून त्यात थोडे मीठ, तेल,पास्ता घालून साधारण दहा मिनिटांसाठी उकळून घ्या. विकतच्या पॅकेटवर तो किती वेळासाठी उकळायचा याची रेसिपी असते.
- उकळून झालेला पास्ता एका चाळणीवर निथळत ठेवा. व ते पाणी सुद्धा बाजूला काढून घ्या. याचा वापर आपण सॉस पातळ करताना करू शकतो.
- कढईत थोड्या तेलावर बारीक केलेला लसूण, व बारीक चिरलेल्या भाज्या घालून मऊ होईपर्यंत परतून घ्या. कढई गॅसवरून काढून घ्या.
- एका नॉनस्टिक भांड्यात बटर घालून घ्या. गॅस बारीक करा. बटर वितळले की, त्यावर मैदा घालून व्यवस्थित मैदा भाजून घ्या. हे करताना मैदा जळणार नाही याकडे लक्ष द्या. सतत ढवळत राहावे. मैद्याचा रंग बदलू लागला की, हळूहळू दूध घाला. म्हणजे गुठळी होणार नाही. मंद गॅसवर क्रिमी होईपर्यंत सॉस शिजवून घ्या.
- या व्हाईट सॉस मध्ये मिरपूड, चिली फ्लेक्स, व ओरिगानो घाला.व भांडे बाजूला ठेवा.
- भाज्यांची कढई गॅसवर ठेवून त्यात शिजवलेला पास्ता घालून मिनिटभर परता. पास्ता चिकटू नये म्हणून पास्ता शिजवून उरलेले थोडे पाणी त्यात घाला. वरून तयार केलेला व्हाईट सॉस घाला. व मिश्रण चांगले ढवळून घ्या. वरून चीज क्यूब किसून घाला. खाण्यासाठी तयार आहे गरमागरम यम्मी चिजी व्हाईट सॉस पास्ता...
काही सुगरण टिप्स :-
- पास्ता निवडताना उत्तम प्रतीचा घ्या. शक्यतो पिवळट रंगाचा असेल तर तो रव्या पासून बनवला जातो.
- पास्ता उकळताना पाण्याचा रंग खूप काळपट आणि फेसाळ असेल तर तो पास्ता निकृष्ट दर्जाचा असू शकतो.
- मैद्या ऐवजी गव्हाचे पीठ सुद्धा तुम्ही वापरू शकता.
- चिली फ्लेक्स आणि ओरिगानो नसेल तरी त्याऐवजी कोथिंबीर आणि बारीक केलेली हिरवी मिरची सुद्धा छान लागते.
माझ्या घरी ही डिश खूप आवडते. तुम्हीसुद्धा अशाप्रकारे हेल्दी अशी पास्ता रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास मैत्रिणी सोबत शेअर करा.
धन्यवाद 🙏
श्री स्वामी समर्थ

0 टिप्पण्या