Instant dosa recipe
Aajcha bet recipes च्या या लेखामध्ये तांदळाच्या पिठापासून अगदी झटपट होणारा इन्स्टंट डोसा कसा करायचा याची रेसिपी दिलेली आहे.रोज-रोज पोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आला असेल आणि डोसा खायची इच्छा झाली असेल तर तांदळाच्या पिठापासून अगदी झटपट होणारा Instant dosa कसा करायचा याची रेसिपी आज मी सांगणार आहे. लहान मुलांना कधी कधी भाजी पोळी खायचा कंटाळा येतो तेंव्हा सुद्धा अगदी नकळत एक-दोन भाज्या घालून कुरकुरीत डोसे करून दिले तर मुलांना नक्कीच आवडतील...
घरात उपलब्ध असलेल्या मोजक्या साहित्यात आणि कमी वेळेत कुरकुरीत डोसे कसे करायचे याची रेसिपी खाली देत आहे.
![]() |
| Instant dosa recipe |
साहित्य :-
१ वाटी तांदळाचे पीठ
२ चमचे बारीक रवा
१ बारीक चिरलेला कांदा
२ चमचे गाजराचा कीस
२ चमचे बारीक चिरलेली सिमला मिरची
२/३ हिरवी मिरची बारीक चिरून
कोथिंबीर
३ वाट्या पाणी
मीठ व तेल
ही रेसीपी सुद्धा करून पहा :- दडपे पोहे / Dadpe Pohe recipe
कृती :-
- घरगुती पद्धतीने बनवलेले किंवा विकतचे तांदळाचे पीठ चाळून घ्या. त्यात थोडं थोडं करून पाणी घालून पीठ सैलसर भिजवून घ्या. अंदाजे तीन वाट्या पाणी लागेल.
- त्यात कांदा, गाजर, सिमला मिरची, हिरव्या मिरच्या व कोथिंबीर घालून पीठ ढवळून घ्या.१० मिनिटांसाठी पीठ झाकून ठेवा.
- मिश्रण चांगले ढवळून घ्या. गॅसवर तवा चांगला तापवून त्यावर थोडे तेल घालून एका वाटीने तयार डोशाचे पीठ तव्याच्या कडेपासून आतपर्यंत अशा पद्धतीने पसरवून घ्या.
- डोसा वरून सुकला की, गॅस मध्यम आचेवर करून तांबूस व कुरकुरीत होईपर्यंत डोसा भाजून घ्या. वरून तेल लावून डोसा उलटून घ्या. व दोन्ही बाजूंनी चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
- हे तांदळाचे डोसे गरम असतानाच खायला घ्या. गार झाल्यानंतर ते मऊ होतात. या डोशा बरोबर खोबऱ्याची चटणी छान लागते.
पीठ न आंबवता सुद्धा इतके सुंदर डोसे होऊ शकतात. अगदी पोटभरीचा नाश्ता म्हणून किंवा मुलांच्या डब्यात देण्यासाठी इन्स्टंट डोसे हा उत्तम पर्याय असू शकतो.ही रेसिपी आवडली तर नक्कीच ट्राय करा. आणि आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा.
धन्यवाद 🙏
श्री स्वामी समर्थ

0 टिप्पण्या