टोमॅटो भाजी / Tomato bhaji recipe

  टोमॅटो भाजी / Tomato bhaji recipe   


     Aajcha bet recipes च्या या लेखामध्ये टेस्टी अशी टोमॅटो ची भाजी कशी करायची याची रेसीपी देत आहे.कधी कधी सकाळची डब्याची भाजी कमी पडते किंवा शिल्लकच राहत नाही. अशावेळी भाजीला काय करायचं असा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो... पुन्हा एकदा दुसरी भाजी करण्याचा जरा कंटाळाच येतो. मग घरात झटपट होणारी भाजी कोणती ?हे पाहिले जाते. अशातच जर घरात बटाटे संपले असतील तर... त्याला दुसरा पर्याय म्हणजे टोमॅटो..
     अगदी कमी वेळेत होणारी टोमॅटोची भाजी किंवा चटणी केली जाते. ‌मुलांना पण ही भाजी खूप आवडते. यासाठी जर पिकलेले टोमॅटो असतील तर फारच छान. अगदी रसरशीत अशी टोमॅटोची भाजी चपाती सोबत छान लागते. याला जास्त तयारीची गरज पण पडत नाही. तुम्ही म्हणाल ही तर अगदी सोपी रेसिपी आहे ... पण आज मी यात वेगळा मसाला वापरून ही रोजचीच भाजी Tomato bhaji recipeअजून छान कशी होईल ते सांगणार आहे......

Tomato-bhaji-recipe
Tomato bhaji recipe

साहित्य :- 


४ पिकलेले टोमॅटो
२ कांदे ( मध्यम शिरलेले) कढईत
१ चमचा मोहरी
१ चमचा जिरे
  चिमूटभर हिंग
२/३ लसूण पाकळ्या बारीक चिरून
५/६ कढीपत्त्याची पाने
२ हिरव्या मिरच्या
१ चमचा पावभाजी मसाला
 साखर चवीनुसार
कोथिंबीर बारीक चिरून
मीठ व तेल

ही रेसीपी सुदधा करून पहा :- vangyache bharit

कृती :-
  1. टोमॅटो स्वच्छ धुऊन मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या.
  2. कढईत २ चमचे तेल गरम करा. त्यात मोहरी, जिरे मिरच्या बारीक चिरलेला लसूण. कढीपत्ता व कांदा घालून मध्यम आचेवर कांदा मऊ होईपर्यंत परता. त्यात हळद व हिंग घाला. टोमॅटोच्या फोडी घालून परता.
  3. २ मिनिटे झाकण ठेवून भाजी वाफवा. त्यात एक चमचा पावभाजी मसाला घालून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीनुसार साखर घालून मिनिटभर परता. व गॅस बंद करा
  4. ही भाजी फार शिजवू नये. गरमागरम भाजी चपाती किंवा भातासोबत खायला घ्या.

काही सुगरण टिप्स :-

  1. भाजीसाठी टोमॅटो शक्यतो लाल व पिकलेले असावेत.
  2. कांदा लाल होईपर्यंत परतू नये. थोडा कच्चा असेल तर दाताखाली छान लागतो.
  3. थोडा रस्सा हवा असेल तर दोन-तीन मिनिटे भाजी जास्त शिजवली तरी चालेल. टोमॅटोला पाणी सुटल्यामुळे भाजी रसरशीत होते.
  4. पावभाजी मसाल्यामुळे भाजीला चव छान येते.

     अशी झटपट होणारी टोमॅटोची चविष्ट भाजी बनवली तर एखादी पोळी जरा जास्तच जाईल. ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि मैत्रिणी सोबत शेअर करा.

धन्यवाद 🙏

श्री स्वामी समर्थ



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या