पनीर बिर्याणी / How to make Paneer biryani
Aajcha bet recipes च्या आजच्या लेखामध्ये शाकाहारी खवय्याना आवडेल अशी चविष्ट पनीर बिर्याणी रेसीपी देत आहे.सध्या सणासुदीचे दिवस आहेत. म्हणून बऱ्याचदा गोडाचे जेवण झालं असेल. आता काहीतरी चमचमीत खाण्याची सगळ्यांची इच्छा असेल. अशीच एक चमचमीत बिर्याणीची रेसिपी खाली देत आहे. बिर्याणी ह्या सगळ्यांचाच वीक पॉईंट असेल... बिर्याणीचे व्हेज-नॉनव्हेज असे अनेक प्रकार आहेत. पण आता बऱ्याच घरात दसरा होईपर्यंत नॉनव्हेज खात नाहीत. पण बिर्याणीची आठवण तर सगळ्यांना येतेच येते. असाच एक व्हेज बिर्याणीचा प्रकार म्हणजे पनीर बिर्याणी....
बिर्याणी करायला वेळ जरी लागला तरी तिची चव मात्र अप्रतिम लागते.. अशावेळी गृहिणी आपलं पाक कौशल्य दाखवण्याचे आटोकाट प्रयत्न करतात. अगदी झटपट होणाऱ्या How to make Paneer biryani recipe खाली देत आहे.
साहित्य :-
५०० ग्रॅम बासमती तांदूळ
३०० ग्रॅम पनीर
१ चमचा हळद
१ चमचा मिरची पावडर
१ चमचा बिर्याणी मसाला
आले -लसूण ,पुदिना पेस्ट
१ चमचा धने पावडर
१ चमचा मीठ
४ मोठे चमचे दही
खडा मसाला-७/८ लवंग, ४/५ काळी मिरी,२ दालचिनीचे तुकडे,२ तमालपत्र,१ चमचा शहाजिरे ३/४ हिरवी वेलची
१०/१२ काजू
३ मोठे कांदे
३/४ हिरव्या मिरच्या
३ टोमॅटोची प्युरी
पुदिना व कोथिंबीर
तेल, तूप व पाणी आवश्यकतेनुसार
केशर घातलेले दूध
ही रेसीपी सुदधा नक्की करून पहा :- soya biryani recipe
कृती :-
- तांदूळ स्वच्छ धुऊन अर्धा तासासाठी भिजवून ठेवावे.
- एका भांड्यात पनीरचे चौकोनी आकाराचे तुकडे घेऊन त्यात हळद, मिरची पावडर, बिर्याणी मसाला, धने पावडर, मीठ, आले लसूण पुदिना पेस्ट मिसळून मॅरीनेशन करून घ्यावे. त्याच भांड्यात एक वाटी ठेवा. त्यात गरम कोळशाचा तुकडा ठेवून त्यावर थोडे तूप घालून भांडे झाकून घ्यावे. अर्धा तास झाकून ठेवावे.
- एका पातेल्यात साधारण २ लिटर पाणी घेऊन उकळण्यासाठी ठेवावे. त्यात वर दिलेला खडा मसाला,१०/१२ काजू, एका कांद्याचे मोठे तुकडे घालून उकळी आणावी.
- २ मोठे कांदे उभे पातळ चिरून गरम तेलात मोठ्या गॅसवर लाल होईपर्यंत खरपूस तळून घ्यावे.
- एका पॅनवर मॅरीनेट केलेले पनीरचे तुकडे थोड्या तेलात व्यवस्थित शॅलो फ्राय करावे. फार शिजवू नये.
- पाण्याला उकळी आल्यावर त्यातील सर्व खडा मसाला ,कांदा व काजूचे तुकडे वरचेवर काढून घ्यावेत. थंड झाल्यावर त्याची पेस्ट करावी.पाण्यात पुदिना चिरून घालावा. तांदूळ टाकून मध्यम गॅसवर तांदूळ ८०% शिजवून घ्यावा. शिजल्यावर पाणी निथळून भात एका ताटात पसरून थंड करावा.
- कढईत तेल व तूप गरम करून त्यात जिरे, आले लसूण पेस्ट, ३/४ हिरव्या मिरच्या,कांदा काजूचे वाटण, घालून तेल सुटेपर्यंत परता. टोमॅटोची प्युरी घालून व्यवस्थित परता. हळद, मिरची पावडर, बिर्याणी मसाला घालून पनीरचे मॅरीनेशन केलेले तुकडे घालावेत. थोडे पाणी घालून मिश्रणाला व्यवस्थित उकळी आणा. गॅस बंद करावा.
- ज्या भांड्यात बिर्याणी करायची आहे. ते भांडे गॅसवर गरम तव्यावर ठेवावे. भांड्याला थोडे तूप लावून घ्यावे. भाताचा एक थर घालावा. त्यावर तळलेला कांदा, बारीक केलेला पुदिना, थोडे तूप घालावे. त्यावर पनीरचे मिश्रण पसरवा. परत भाताचा थर द्यावा. पुन्हा तळलेला कांदा, पुदिना, तूप व केशर घातलेले दूध घाला. पुन्हा एकदा उरलेली पनीरची भाजी घालून शेवटी उरलेला सगळा भात घालून वरून कांदा, पुदिना, तूप व केशर घातलेले दूध घालून भांडे घट्ट झाकणाने बंद करा. वरून काहीतरी जड वजन ठेवा. म्हणजे वाफ जाणार नाही.१५ मिनिटे बिर्याणीला वाफवा.
- सर्वात शेवटी बिर्याणीच्या पातेल्यात एका वाटीत कोळशाचा तुकडा गरम करून ठेवा. त्यावर थोडं तूप घालून पुन्हा झाकण बंद करा. अशाप्रकारे स्मोक दिला तर बिर्याणीला हॉटेल सारखी चव येते.
खाण्यासाठी तयार आहे अगदी हॉटेलच्या चवीची पनीर दम बिर्याणी... नक्की ट्राय करा👍🏻 आवडल्यास मैत्रिणींसोबत शेअर करा.
धन्यवाद 🙏
श्री स्वामी समर्थ
0 टिप्पण्या