आपल्या पारंपरिक आहारामध्ये लाडू हे नेहमीच महत्त्वाचे स्थान राखून आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ऊर्जा देणारे, पौष्टिक आणि पोटभर वाटणारे लाडू मधल्या वेळेत खाण्यासाठी उत्तम पर्याय ठरतात. शेंगदाणा लाडू, बेसन लाडू, डिंकाचे लाडू, ड्रायफ्रूट लाडू यांसोबतच हिवाळ्यासाठी खास असा एक पारंपारिक पदार्थ म्हणजे मेथीचे लाडू.
आजच्या Aajcha Bet Recipes च्या या लेखामध्ये आपण अजिबात कडू न होणारे, खमंग आणि अत्यंत पौष्टिक मेथीचे लाडू कसे करायचे ते सविस्तर पाहणार आहोत. ही Methiche Ladoo Recipe in Marathi थंडीमध्ये शरीर बळकट ठेवण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि आरोग्यरूपी गोडवा निर्माण करण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल.
![]() |
| मेथीचे लाडू रेसिपी मराठीत - Winter Special |
मेथीचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-
- १०० ग्रॅम मेथी दाणे
- १०० ग्रॅम खारीक पूड
- १ अख्खा गोटा सुके खोबरे (किसलेले)
- १०० ग्रॅम काजू बदाम
- १०० ग्रॅम खायचा डिंक
- ५० ग्रॅम मखाने
- ५० ग्रॅम अळीव
- २ चमचे खसखस
- दीड वाटी गव्हाचे पीठ
- वेलची पावडर
- जायफळ पावडर
- सुंठ पावडर
- ५०० ग्रॅम गुळ (किसलेला)
- २५० ग्रॅम साजूक तूप
- १ वाटी दूध
ही रेसीपी सुद्धा करून पहा :- मुरमुरा लाडू | Murmura Ladoo recipe
मेथीचे लाडू कसे करायचे ? (Step by Step Methiche Ladoo Recipe)
स्टेप 1 : मेथी पावडर तयार करणे
मेथी दाणे हलके गरम करून मिक्सरमध्ये बारीक वाटा. ही पावडर चाळणीने चाळून रवाळ करा. नंतर वाटीभर दुधात ही मेथी पावडर किमान ५–६ तास भिजत ठेवा. यामुळे मेथीचा कडूपणा कमी होतो.
स्टेप 2 : खारीक व खोबरे परतणे
कढईत खारीक पावडर हलकी गरम करून घ्या. करपू देऊ नका.
सुके खोबरे किसून हलके तांबूस रंगावर परतून घ्या.
स्टेप 3 : सुकामेवा व डिंक तळणे
थोड्या तुपावर काजू-बदाम तळून घ्या.
डिंक थोडा थोडा घालून मंद आचेवर फुलवून घ्या.
मखाने सुद्धा तुपावर हलके लालसर होईपर्यंत परता.
स्टेप 4 : अळीव व गव्हाचे पीठ भाजणे
अळीव कढईत तूप न घालता चटचट आवाज येईपर्यंत गरम करा.
नंतर तूप घालून गव्हाचे पीठ मंद आचेवर तांबूस रंगावर भाजा. यावेळी खसखस घालावी.
स्टेप 5 : मेथी पावडर भाजणे
दुधात भिजवलेली मेथी पावडर थोड्या तुपात मंद आचेवर तांबूस रंगावर भाजा.
स्टेप 6 : सर्व साहित्य एकत्र करणे
भाजलेली मेथी पावडर गव्हाच्या पिठावर घालून नीट मिसळा.
तळलेले ड्रायफ्रूट्स, खोबरे, मखाने व डिंक मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.
हे मिश्रण अळीव, वेलची-जायफळ, सुंठ पावडर सोबत एकत्र करा.
स्टेप 7 : लाडू वळणे
तयार मिश्रणात किसलेला गूळ घालून हाताने नीट एकजीव करा.
मध्यम आकाराचे लाडू वळा. साधारण ३५–४० लाडू तयार होतात.
काही सुगरण टिप्स :-
- मेथी पावडर दुधात भिजवल्याने कडूपणा निघून जातो।
- डिंक नेहमी मध्यम आचेवरच तळावा.
- गूळ वापरल्याने चव व पौष्टिकता वाढते.
- ड्रायफ्रूट्स जाडसर वाटावेत.
- हवाबंद डब्यात ठेवले तर लाडू महिनाभर टिकतात.
- लाडू खाल्ल्यानंतर पाणी न पिता गरम दूध घ्यावे.
मेथीच्या लाडूचे शरीराला होणारे फायदे :-
- रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
- सर्दी, खोकला, घसा खवखव कमी होतो.
- मधुमेह व हृदयविकारात उपयुक्त.
- पचनक्रिया सुधारते.
- बाळंतीण महिलांसाठी अत्यंत पौष्टिक.
- हाडे व सांधे मजबूत होतात.
- थंडीमध्ये शरीर उष्ण राहते.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
१) मेथीचे लाडू कडू का होत नाहीत?
- मेथी पावडर दुधात भिजवून नंतर मंद आचेवर भाजल्यामुळे तिचा कडूपणा निघून जातो.
२) मेथीचे लाडू रोज खाऊ शकतो का?
- होय, हिवाळ्यात रोज १ लाडू दूधासोबत खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
३) मेथीचे लाडू किती दिवस टिकतात?
- हे लाडू हवाबंद डब्यात ठेवल्यास २५–३० दिवस टिकतात.
४) मेथीचे लाडू मधुमेहींना चालतात का?
- होय, प्रमाणात घेतल्यास मेथीचे लाडू मधुमेहींसाठी उपयुक्त ठरतात.
५) बाळंतीण महिलांनी मेथीचे लाडू खावेत का?
- होय, डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्यास हे लाडू खूप फायदेशीर ठरतात.
अशा प्रकारे तयार केलेले मेथीचे लाडू घरातील प्रत्येक जण आवडीने खातो.ही Methiche Ladoo Recipe in Marathi नक्की ट्राय करा आणि आवडल्यास शेअर करा.अशाच पारंपारिक व आरोग्यदायी रेसिपीसाठी
आजचा बेत रेसिपीज ब्लॉगला भेट देत रहा.
धन्यवाद 🙏
श्री स्वामी समर्थ

0 टिप्पण्या