पौष्टिक डिंकाचे लाडू / Dinkache Ladoo Recipe in Marathi (Updated 2026)

 

    थंडीची सुरुवात होताच सांधेदुखी, कंबरदुखी, सर्दी-खोकला, कफ, अशक्तपणा यांसारख्या समस्या वाढतात. अशा वेळी शरीराला उष्णता, ताकद आणि ऊर्जा देणारे डिंकाचे लाडू हा एक पारंपारिक व रामबाण उपाय मानला जातो.पूर्वी आजी-आजोबांच्या काळात हिवाळ्यात खास करून मेथीचे लाडू, मुरमुरे लाडू, तिळाचे लाडू आणि डिंकाचे लाडू घराघरात बनवले जायचे.
    आजच्या या लेखामध्ये आपण गुळाचा पाक न करता, सोप्या पद्धतीने डिंकाचे लाडू कसे करायचे ते सविस्तर पाहणार आहोत. ही dinkache ladoo recipe in marathi हिवाळ्यासाठी अत्यंत उपयुक्त, पौष्टिक आणि चवीला अप्रतिम आहे.


पौष्टिक डिंकाचे लाडू रेसिपी मराठीत
डिंकाचे लाडू रेसिपी मराठीत- पौष्टिक हिवाळी लाडू 

डिंकाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-

  • २५० ग्रॅम बारीक किसून घेतलेले खोबरे
  • २५० ग्रॅम खारीक पावडर (काळी/ पिवळी)
  • २०० ग्रॅम खायचा डिंक
  • १०० ग्रॅम बदाम
  • १०० ग्रॅम काजू
  • १०० ग्रॅम अक्रोड
  • ५० ग्रॅम पांढरे तीळ
  • २ चमचे खसखस
  • १०० ग्रॅम अळीव / हळीव
  • १५० ग्रॅम मखाने
  • २५०/३०० ग्रॅम तूप
  • २५०/३०० ग्रॅम सेंद्रिय गुळ
  • १ चमचा सुंठ पावडर
  • १ चमचा वेलची / जायफळ पावडर

ही रेसीपी सुद्धा नक्की करून पहा :-  दामट्याचे लाडू  रेसिपी /  Damtyache ladoo recipe in marathi 

डिंकाचे लाडू कसे करायचे ? (Dinkache Ladoo Recipe Step by Step)

स्टेप 1 : खारीक पावडर तयार करणे

खारीक चांगली वाळवून त्यातील बिया काढा. थोड्या तुपावर मंद आचेवर खारीक परतून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून खारीक पावडर तयार करा.

स्टेप 2 : कोरडे साहित्य भाजणे

जाड बुडाच्या कढईत खोबऱ्याचा कीस खमंग भाजून बाजूला काढा.
त्याच कढईत तीळ व खसखस हलकी भाजा.
मखाने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
अळीव करपू न देता मंद आचेवर भाजून घ्या.

स्टेप 3 : खारीक पावडर परतणे

अर्धा चमचा तूप घालून खारीक पावडर हलकी परता. गोड असल्यामुळे ती पटकन करपते, म्हणून सतत हलवत ताटात काढा.

स्टेप 4 : सुकामेवा व डिंक तळणे

कढईत थोडे तूप घालून बदाम, काजू, अक्रोड खमंग भाजा.
नंतर डिंक मंद आचेवर पूर्ण फुलेपर्यंत तळा. डिंक योग्य तळला गेला की तो सहज चुरगळता येतो.

स्टेप 5 : मिक्सरमध्ये बारीक करणे

प्रथम तळलेला डिंक मिक्सरमध्ये बारीक करा.
नंतर सुकामेवा, तीळ, खसखस व अळीव एकत्र बारीक करा.
शेवटी मखाने बारीक करा.

स्टेप 6 : सर्व साहित्य एकत्र करणे

सर्व बारीक केलेले साहित्य परातीत एकत्र करा.
त्यात वेलची-जायफळ पूड आणि सुंठ पावडर घालून हाताने नीट मिसळा.

स्टेप 7 : गूळ विरघळवणे

कढईत उरलेले तूप गरम करा.
त्यात किसलेला गूळ घालून फक्त विरघळेपर्यंत ठेवा. पाक करू नका, नाहीतर लाडू कडक होतात.

स्टेप 8 : लाडू वळणे

गरम गूळ लगेच मिश्रणात घालून नीट मिसळा.
मिश्रण कोमट असतानाच लाडू वळा. गरज असल्यास थोडे गरम तूप घालू शकता.

डिंकाचे लाडू खाण्याचे फायदे (Benefits of Dinkache Ladoo) :-

  • थंडीमध्ये शरीराला उष्णता व ताकद मिळते.
  • हाडे व सांधे मजबूत होतात.
  • कंबरदुखी व सांधेदुखी कमी होण्यास मदत.
  • पचनशक्ती सुधारते व अशक्तपणा दूर होतो.
  • सुकामेवामुळे स्मरणशक्ती वाढते.
  • हळीवमुळे केसांची वाढ सुधारते.
  • मखाणे व खोबऱ्यामुळे प्रोटीन व फायबर मिळते.
  • बाळंतीण महिला, लहान मुले व वृद्धांसाठी उपयुक्त.
  •  मधुमेहींसाठी गुळाऐवजी खजूर वापरता येतो.

काही उपयुक्त टिप्स -

  • उपवासासाठी गव्हाच्या पिठाऐवजी शिंगाड्याचे पीठ वापरू शकता.
  • रोज सकाळी १ लाडू व एक ग्लास दूध घेतल्यास दिवसभर ऊर्जा मिळते.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ) 

१) डिंकाचे लाडू रोज खाऊ शकतो का?

-  होय, डिंकाचे लाडू रोज १ प्रमाणात खाऊ शकतो. विशेषतः हिवाळ्यात रोज सकाळी १ लाडू आणि एक ग्लास दूध घेतल्यास चांगली ऊर्जा मिळते.

२) डिंकाचे लाडू कधी खावेत?

-डिंकाचे लाडू सकाळी नाश्त्याच्या वेळी किंवा दुपारी खाणे अधिक फायदेशीर ठरते. रात्री उशिरा खाणे टाळावे.

३) डिंकाचे लाडू बाळंतीण महिलांसाठी फायदेशीर आहेत का?

- होय, डिंकाचे लाडू बाळंतीण महिलांसाठी खूप पौष्टिक असतात. ते हाडे मजबूत करतात व अशक्तपणा कमी करतात. मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य.

४) डिंकाचे लाडू मधुमेहींना चालतात का?

मधुमेहींनी गुळाऐवजी खजूर वापरून हे लाडू बनवू शकतात आणि प्रमाण मर्यादित ठेवावे.

५) डिंकाचे लाडू किती दिवस टिकतात?

- हे लाडू हवाबंद डब्यात ठेवले तर २०–२५ दिवस सहज टिकतात. फ्रिजमध्ये ठेवल्यास १ महिना सुद्धा टिकू शकतात.

  या हिवाळ्यात नक्कीच हे पौष्टिक डिंकाचे लाडू करून पहा.रेसिपी आवडली असेल तर मैत्रिणींना शेअर करा आणिअशाच पारंपारिक व आरोग्यदायी रेसिपीसाठी आजचा बेत रेसिपीज ब्लॉग फॉलो करा. 

धन्यवाद 🙏

श्री स्वामी समर्थ





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या