सोया नगेटस् / Soya nuggets recipe

 सोया नगेटस् / Soya nuggets recipe  

   Aajcha bet recipes च्या या लेखामध्ये सोया चंक्स पासून बाजारात मिळतात तसे क्रिस्पी सोया  नगेटस कसे करायचे याची रेसिपी दिलेली आहे.आजकाल फास्ट फूडचा जमाना आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच बाहेरचे पदार्थ खायला आवडतात. अचानक एखादा चमचमीत पदार्थ खायची इच्छा झाली तर फक्त एका क्लिकवर तो पदार्थ घरबसल्या मागवला जातो. त्यासाठी डिलिव्हरी चार्जेस आकारले जातात. अनेक मोठ्या कंपन्या फूड बिजनेस करू लागल्या आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार सर्वच पदार्थ ऑनलाइन मागवले जातात. परंतु प्रत्येकाला हे परवडत नाही. आज-काल सोशल मीडियावर हे सर्व पदार्थ कसे करायचे? याच्या रेसिपीज पाहायला मिळतात. अशीच एक वेगळ्या प्रकारची हटके रेसिपी मी या लेखात दिली आहे.

    KFC या ब्रँडचे अनेक पदार्थ प्रसिद्ध आहेत. चिकन नगेटस् बऱ्याच जणांना खायला आवडतात. परंतु शाकाहारी लोकांना हे पदार्थ खाता येत नाहीत. म्हणूनच चिकन ऐवजी जरा ट्विस्ट देऊन ही रेसिपी बनवली आहे. चला तर मग पाहूया सोया चंक्स पासून पासून बनवलेले टेस्टी Soya nuggets recipe!!

     सोयाबीन हे भरपूर प्रोटीन आणि फायबर चा स्त्रोत आहे. म्हणूनच मांसाहार न करणाऱ्या लोकांचा प्रोटीनचा साठा भरून काढण्यासाठी डॉक्टर, आणि आहार तज्ञ आहारात सोयाबीनचा वापर करण्यासाठी सांगतात. परंतु सोयाबीन ची भाजी अनेक जणांना आवडत नाही. म्हणूनच सोया पुलाव, सोया मिल्क, सोया पासून बनवलेले पनीर(तोफू) अशा अनेक पदार्थातून सोयाबीन आहारात वापरले जाते. म्हणूनच सोया चंक्स पासून बनवलेली ही रेसिपी 💯अगदी सगळेच आवडीने खातील.



Soya-nuggets-recipe
Soya nuggets recipe

साहित्य :-

१५० ग्रॅम सोया चंक्स
१ उकडलेला बटाटा
४/५ हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
१ चमचा धने पावडर
१ चमचा जिरे पावडर
१ चमचा चाट मसाला
१ चमचा काळीमिरी पूड
१ चमचा चिली फ्लेक्स
२ चमचे कॉर्नफ्लोअर
१ चमचा सैंधव मीठ
कॉर्न फ्लेक्स भरड करून
२ चमचे मैदा व पाणी
तेल

ही रेसीपी सुद्धा करून पहा :- पास्ता / How to make white sauce pasta

कृती :-

  1. सर्वप्रथम बाजारात मिळणारे सोया चंक्स स्वच्छ धुऊन१५ मिनिटांसाठी गरम पाण्यात भिजत घालून ठेवावेत.
  2.  भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घालून सर्व मिश्रण पाणी न घालता वाटून घ्यावे.
  3. आता हे वाटलेले मिश्रण एका बाऊलमध्ये काढून त्यामध्ये उकडलेला बटाटा कुस्करून घालावा. वरून धने जिरे पावडर, चाट मसाला, चिली फ्लेक्स, थोडी काळी मिरी पूड, मीठ, थोडे कॉर्नफ्लॉवर घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.
  4. या मिश्रणाचे लांबट आकाराचे कटलेट करून घ्यावेत. कॉर्न फ्लेक्स ची भरड करून घ्यावी. दोन चमचे मैद्यात पाणी घालून पातळसर स्लरी करून घ्यावी.
  5. सोयाचे नगेटस् कॉन्फ्लेक्सच्या भरडमध्ये घोळवून नंतर मैद्याच्या स्लरी मध्ये बुडवून कडकडीत तेलात तांबूस रंगावर तळून घ्यावेत. अशाप्रकारे सर्व नगेटस् कुरकुरीत तळून टोमॅटो सॉस आणि मेयोनीज सोबत सर्व्ह करावे.

    अशाप्रकारे वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे सोया नगेटस् संध्याकाळचा नाश्ता म्हणून किंवा छोट्या पार्टीसाठी स्टार्टर म्हणून सुद्धा बनवू शकता. चला तर मग ही रेसिपी नक्की करून पहा आणि आवडली तर जरूर कमेंट मध्ये रिप्लाय द्या. आपल्या मैत्रिणी सोबत शेअर करून माझ्या "आजचा बेत" या रेसिपी ब्लॉगला नक्की फॉलो करा....🙏👍🏻 (रेसिपीच्या शेवटी फॉलो या ऑप्शन वर क्लिक करा)
या ब्लॉगवर अशाच नवनवीन रेसिपी पहात रहा!!
धन्यवाद🙏

श्री स्वामी समर्थ





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या