मिसळ कशी बनवायची / Misal recipe
Aajcha bet recipes च्या या लेखामध्ये झणझणीत लालजर्द तर्रीवाली मिसळ कशी करायची याची रेसीपी दिली आहे.मोड आलेली मटकी, त्यावर फरसाण, झणझणीत लालजर्द तर्री, वरून बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, आणि वरून लिंबाचा रस सोबत पाव एवढे वर्णन जरी ऐकले तरी खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते... अगदी मोठ-मोठ्या हॉटेलपासून ते रस्त्यावरच्या फूड स्टॉलवर मिळणारा झणझणीत खाद्य प्रकार म्हणजे मिसळपाव... महाराष्ट्राचे नाव हे अनेक स्ट्रीट फुड साठी प्रसिद्ध आहे. अगदी वडापाव पासून भेळपुरी पर्यंत सर्वच पदार्थ खाद्य प्रेमी अगदी आवडीने खातात. त्यातलाच मिसळपाव असा पदार्थ आहे,की जो अगदी सकाळच्या नाष्टयापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही खाल्ला तरी पोट आणि मन तृप्त होते...
आपल्याकडे मिसळ ही भागानुसार वेगवेगळ्या चवीची असली तरी मिसळ आवडत नाही असा शोधूनही सापडणार नाही. पुणेरी मिसळ आणि कोल्हापुरी मिसळ बहुतेक सर्वत्र प्रसिद्ध आहे. अनेक हॉटेल्स मध्ये दिवसभर केव्हाही गेले तरी हमखास मिळणारा पदार्थ म्हणजे मिसळपाव... एखाद्याला जर तिखट आवडत नसेल तर या मिसळ सोबत दही सुद्धा खाल्ले जाते. त्यामुळे मिसळचा तिखटपणा जाणवत नाही. मिसळ वाढताना जरा जरी चूक झाली तरी तिचा लगदा झालाच म्हणून समजा. म्हणून ती वाढताना काळजीपूर्वक वाढणे ही सुद्धा एक कला आहे.. आणि मिसळ प्रेमींना ती जमतेच..💯👍🏻 अशीच मिसळ घरी बनवली तरी तिची चव हॉटेल सारखी होत नाही. तरीसुद्धा माझ्या सुगरण मैत्रीणी हा प्रयत्न करतच असतात. प्रत्येकीची मिसळ बनवण्याची पद्धत वेगळी असते. आपल्या आजचा बेत या ब्लॉगवर आज मिसळ कशी बनवायची / Misal recipe in Marathi दिलेली आहे..
![]() |
| मिसळ कशी बनवायची / Misal recipe |
साहित्य :-
कृती :-
- मिसळ साठी सर्वप्रथम कोरडा मिसळ मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी कढईत वरील सर्व साहित्य हलकेसे गरम करून थंड झाल्यावर मिक्सरवर पावडर करून घ्या. तयार आहे मिसळ मसाला.
- मोड आलेली मटकी स्वच्छ धुऊन घ्या. कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता व हळद घालून फोडणी करा. त्यावर मटकी घालून परतून घ्या. वरून लागेल तेवढे गरम केलेले पाणी घाला. उकळी आल्यावर झाकण ठेवून १० मिनिटे तरी शिजवून घ्या.
- आता तर्री साठी लागणारे वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी कढईत सुक्या खोबऱ्याचा कीस व तीळ परतून घ्या. नंतर थोड्या तेलावर २ उभे चिरलेले कांदे तांबूस रंग येईपर्यंत चांगले परतून घ्या. त्यातच चिरलेला टोमॅटो, आले, लसूण घालून चांगले परतून घ्या. आता हे मिश्रण थंड झाल्यावर वाटण तयार करून घ्यावे.
- आता मिसळचा कट किंवा तर्री तयार करण्यासाठी एका पातेल्यात नेहमीपेक्षा जरा जास्तच तेल घाला. म्हणजे तर्रीचा रंग छान येतो. त्यात घरगुती वापरला जाणारा कांदा मसाला, तयार मिसळ मसाला, आणि बेडगी मिरची पावडर घालून परतून घ्या. लगेचच तयार वाटण घालून तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्या. नंतर वरून हवे तेवढे उकळलेले गरम पाणी घालावे. रस्सा छान उकळून घ्यावा. त्यात शिजवलेल्या मटकीच्या अर्धी मटकी आणि त्याचा रस्सा घालून पुन्हा एकदा दोन-तीन मिनिटं उकळी आणा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. तयार आहे झणझणीत मटकीचा कट किंवा तर्री...
- मिसळ पाव खाण्यासाठी वाढताना एका डिश मध्ये थोडे फरसाण, त्यावर शिजवलेली मटकी, तयार केलेला मटकीचा कट, वरून बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर व लिंबाचा रस पिळून पावासोबत मिसळ वाढावी...

0 टिप्पण्या