Eggless Carrot Cake Recipe
Aajcha bet recipes च्या या लेखामध्ये अंड्याचा वापर न करता गाजराचा केक कसा करायचा याची रेसिपी दिली आहे.आजकाल बाजारात लालचुटूक गाजरं भरपूर प्रमाणात दिसू लागली आहेत. आणि गाजर म्हटलं की, सर्वप्रथम आठवतो तो तोंडाला पाणी आणणारा गाजराचा हलवा... परंतु या गाजरापासून केक सुद्धा बनवू शकतो. हे माहिती आहे का तुम्हाला? आणि तोही बिना अंड्याचा... अगदी सोप्या घरगुती पद्धतीने, कोणत्याही प्रकारचा ओव्हन न वापरता, कुकरचा वापर करून गाजराचा केक (Eggless Carrot Cake Recipe)कसा करायचा याची सोपी रेसिपी मी आपल्यासाठी देत आहे.
आणि हो मैत्रिणींना..ही रेसिपी मी माझ्या मुलीच्या शाळेत घेतलेल्या पालकांच्या पाककला स्पर्धेत पहिल्यांदा ट्राय केली. आणि त्यासाठी मला दुसरे बक्षीस मिळाले.तेव्हापासून घरी केक करण्यासाठी मला अजूनच प्रोत्साहन मिळाले. कारण त्या आधीपासूनच केकच्या बाबतीत मी अनेक प्रयोग केले. बऱ्याचदा ते यशस्वी झाले आणि कधी कधी तर ते फसले सुद्धा..केक करताना ज्या काही छोट्या छोट्या चुका होतात. त्या होऊ नये म्हणून काही टिप्स मी इथे देणार आहे. चला तर मग हा वेगळ्या चवीचा गाजराचा केक कसा करायचा ते पाहूया...
![]() |
| Eggless Carrot Cake Recipe |
साहित्य :-
- गॅसवर एक कुकर गरम करायला ठेवा. झाकणाची शिट्टी आणि रिंग काढून ठेवा. कुकरच्या तळाशी वाटीभर मीठ किंवा वाळू गरम करायला ठेवा. कुकरमध्ये एक स्टँड ठेवा. आणि झाकण लावून दहा मिनिटांसाठी कुकर प्रीहीट करून घ्या.
- केक ज्या भांड्यात करायचा आहे. त्याला आतून थोडेसे तेल लावून त्यावर मैदा भुरभुरून ते भांडे केक साठी सेट करून घ्यावे.
- मिक्सरच्या भांड्यात दही, पिठीसाखर, तेल आणि इसेन्स घालून एकदा फिरवून घ्या. तयार मिश्रण एका काचेच्या बाऊलमध्ये काढून घ्या.
- दुसरीकडे मैदा, कॉर्नफ्लोअर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा एकत्रित चाळून घ्यावे.
- आता हे कोरडे मिश्रण थोडे थोडे करून ओल्या मिश्रणात घालून व्यवस्थित एकजीव करावे. त्यात गाजराचा किस आणि वेलची, दालचिनी पूड घालून पुन्हा एकदा एकत्र करावे. हे मिश्रण घट्ट वाटल्यास थोडेसे दूध घालावे. मिश्रण फार पातळ होणार नाही याची काळजी घ्यावी. चमचाभर विनेगर घालून मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करून घ्या.
- आता वेळ न घालवता तयार मिश्रण भांड्यात ओतून घ्या. भांडे एकदा अलगद आपटून घ्यावे म्हणजे एअर बबल राहणार नाही.
- केकचे भांडे लगेचच कुकरमध्ये ठेवा.कुकरचे झाकण लावून केक तीस मिनिटांसाठी बेक करून घ्या.
- केक झाला आहे का नाही हे पाहण्यासाठी एक टूथपिक किंवा सुरीने चेक करा. टूथपिकला पीठ चिकटले नाही तर केक झाला असे समजावे. गॅस बंद करून केक थंड करून घ्यावा. हा केक ताटात काढून कापून घ्या. तयार आहे गाजराचा स्वादिष्ट असा केक.
ही रेसिपी सुध्दा वाचा : Eggless Plum Cake recipe
काही सुगरण टिप्स :-
- केक साठी घेणारा मैदा हा ताजाच असावा. तसेच इथे मी कॉर्नफ्लोर वापरले आहे. त्यामुळे केक मऊसूत होतो.
- अंड्याचा वापर न करता दह्याचा वापर केला आहे. त्यामुळे केक छान फुलतो.अंडी खात असाल तर दह्याऐवजी २ अंडी वापरावीत.
- बेकिंग पावडर किंवा सोडा सुद्धा फार जुना वापरू नये. त्यामुळे केक फुगत नाही. खाली बसतो.
- प्रत्येक पदार्थ हा प्रमाणात मोजूनच घ्यावा.
- कुकर प्रीहीट करणे गरजेचे आहे. नाहीतर केक कच्चा राहील. फुगणार नाही. वेळेपेक्षा जास्त वेळ केक शिजवू नये. गॅस मध्यम आचेवर ठेवावा.
- केकचे मिश्रण जास्त फेटू नये. विनेगर घातल्याने सोडा ऍक्टिव्ह होतो. आणि त्यामुळे केक छान फुलतो.आणि जाळीदार होतो.
- वेलची आणि दालचिनी पूड घातल्याने छान चव येते. या केकला गाजरामुळे छान रंग येतो.
- कुकरची शिट्टी आणि झाकणाची रिंग नक्की काढावी.
- केक साठी वापरणारे तेल शक्यतो सनफ्लॉवर किंवा सोयाबीनचे असावे. त्याला वास नसतो. शेंगदाण्याचे तेल वापरू नये. त्याचा उग्र वास असतो.
- दही किंवा दूध वापरताना ते फ्रीजमधील नसावे. नॉर्मल टेंपरेचर चे असावे.

0 टिप्पण्या