आजचा बेत रेसिपीज मध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी ढाब्यावर मिळते तशी काजू पनीर मसाला भाजी. ही रेसिपी खास घरगुती साहित्य आणि साध्या मसाल्यांमध्ये तयार केली असून चव मात्र एकदम हॉटेल स्टाईल लागते. बाहेर एका प्लेटसाठी जास्त पैसे खर्च करण्यापेक्षा, हीच चविष्ट भाजी तुम्ही घरी संपूर्ण कुटुंबासाठी अगदी स्वस्तात आणि पौष्टिक पद्धतीने बनवू शकता.
ही Kaju Paneer Masala recipe in Marathi पार्टी, सण, पाहुणे किंवा रविवारच्या खास जेवणासाठी परफेक्ट आहे. चला तर मग पाहूया स्टेप बाय स्टेप सविस्तर कृती.
![]() |
| घरच्या घरी बनवा ढाबा स्टाइल काजू पनीर मसाला रेसिपी |
काजू मसाला पनीर भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य :-
मुख्य साहित्य -
- मलई पनीर २५० ग्रॅम
- काजू १०० ग्रॅम
ग्रेव्हीसाठी साहित्य :-
- कांदे – 2 मध्यम आकाराचे
- टोमॅटो – 3 मोठे लालबुंद
- लसूण – 10 ते 12 पाकळ्या
- आलं – 1 इंच
- तिखट – 1 चमचा
- काश्मीरी मिरची पावडर – 1 चमचा
- हळद – 1/4 चमचा
- किचन किंग मसाला – 1/2 चमचा
- कसुरी मेथी – 1 चमचा
- तेल / तूप / बटर – आवश्यकतेनुसार
- मीठ – चवीनुसार
ही रेसीपी सुद्धा नक्की करून पहा :- कढाई पनीर / Kadhai Paneer
ढाबा स्टाइल काजू मसाला पनीर भाजी कशी करायची?
स्टेप 1 : पनीर व काजूची तयारी
ताजे व मऊ पनीर धुवून पनीर बुडेल एवढ्या पाण्यात भिजत ठेवा. त्यामुळे पनीर नरम राहते. 100 ग्रॅम काजूपैकी 50 ग्रॅम काजू 15 मिनिटे भिजवून ठेवा.
स्टेप 2 : हॉटेल स्टाईल वाटण तयार करणे
कढईत थोडे तेल व तूप गरम करा. त्यात उभा पातळ चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परता. टोमॅटो घालून नरम होईपर्यंत परता. भिजवलेले काजू, आलं व लसूण घालून परतून गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये अगदी बारीक पेस्ट करा.
स्टेप 3 : पनीर व काजू तळणे
कढईत थोडे तेल घालून उरलेले काजू हलके सोनेरी तळून बाजूला काढा. पनीरचे मध्यम तुकडे करून हलकेसे परतून कोमट मिठाच्या पाण्यात ठेवा.
स्टेप 4 : ग्रेव्ही तयार करणे
त्याच कढईत वाटण घालून मंद आचेवर सतत परतत तेल सुटेपर्यंत शिजवा. हळद, तिखट, काश्मीरी मिरची, कसुरी मेथी घाला. गरजेनुसार गरम पाणी घालून ग्रेव्ही उकळवा.
स्टेप 5 : अंतिम टच
ग्रेव्हीमध्ये पनीर व तळलेले काजू घालून 5 मिनिटे शिजवा. गरमागरम ढाबा स्टाईल काजू पनीर मसाला तयार!
काही सुगरण टिप्स :-
- काजू भिजवून वापरल्याने ग्रेव्ही क्रीमी होते.
- पनीर तळून मिठाच्या पाण्यात ठेवल्यास वातड होत नाही.
- ग्रेव्ही जितकी छान शिजेल तितकी चव वाढते.
- कसुरी मेथी भाजून घातल्यास खमंग स्वाद येतो.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ) -
१) काजू पनीर मसाला किती दिवस टिकते?
- फ्रिजमध्ये 1 दिवस टिकू शकते, मात्र ताजी खाल्ली तर चव उत्तम लागते.
२) काजू न वापरता करता येईल का?
- काजू मुळेच हॉटेल स्टाईल क्रीमीपणा येतो, पण प्रमाण कमी.
3) काजू पनीर मसाला कशासोबत छान लागते?
- ही भाजी तंदुरी रोटी, बटर नान, फुलका किंवा जीरा राईस सोबत अप्रतिम लागते.लहान पार्टी किंवा घरगुती कार्यक्रमासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा.
अशी ही सोपी, चविष्ट आणि ढाबा स्टाईल Kaju Paneer Masala recipe in Marathi तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी आवडली असेल तर शेअर करा आणि अशाच अधिक पारंपरिक मराठी रेसिपीसाठी आजचा बेत रेसिपीज ब्लॉगला फॉलो करा.
धन्यवाद 👍🏻🙏
श्री स्वामी समर्थ 🙏

0 टिप्पण्या