पारंपारिक कुरडई कांदा भाजी रेसिपी / Kurdai Kanda Bhaji Recipe in Marathi



    आजचा बेत रेसिपीज च्या या लेखामध्ये आपण पारंपारिक कुरडई कांदा भाजी कशी करायची ते पाहणार आहोत. उन्हाळा सुरू झाला की खेडेगावात वाळवणांची लगबग सुरू होते आणि त्यात कुरडई हा एक अविभाज्य घटक आहे. शिल्लक राहिलेल्या कुरडयांच्या भुग्यापासून तयार होणारी ही भाजी झटपट, चविष्ट आणि अगदी पारंपारिक आहे. अचानक पाहुणे आले असतील, घरात भाजी नसेल किंवा मुलांच्या डब्यासाठी काहीतरी वेगळं हवं असेल, तर ही Kurdai Kanda Bhaji Recipe in Marathi एकदम परफेक्ट आहे.

    

पारंपारिक कुरडई कांदा भाजी-महाराष्ट्रीयन रेसीपी
पारंपारिक कुरडई कांदा भाजी-महाराष्ट्रीयन रेसीपी

कुरडई कांदा करण्यासाठी लागणारे साहित्य :-

  • ३/४ गव्हाच्या कुरडया किंवा शिल्लक  भुगा
  • २ मध्यम आकाराचे कांदे (बारीक चिरलेले)
  • ३/४ हिरव्या मिरच्या 
  • १ मध्यम आकाराचा टोमॅटो 
  • १ चमचा कांदा लसूण मसाला
  • १ चमचा लाल तिखट
  • १/२ चमचा हळद
  • १/२ चमचा धणेपूड
  • १ चमचा मोहरी
  • १/२ चमचा जिरे
  • कोथिंबीर
  • आवडीनुसार जाडसर शेंगदाण्याचे कूट
  • मीठ आणि तेल

ही रेसिपी सुद्धा नक्की करून पहा :- जीत वडा रस्सा भाजी

कृती -

कुरडई कांदा भाजी बनवण्याची सोपी पद्धत 

  1. गव्हाच्या कुरडया छोटे तुकडे करून कोमट पाण्यात ३० मिनिटे भिजवा. नंतर पाणी काढून हलकेच दाबून निथळून घ्या.
  2. कढईत तेल गरम करून मोहरी व जिरे घालून फोडणी द्या.
  3. हिरव्या मिरच्या व कांदा घालून कांदा गुलाबी होईपर्यंत परता. जास्त भाजू नका.
  4. टोमॅटो, हळद, तिखट, धणेपूड व कांदा-लसूण मसाला घालून मिनिटभर परता.
  5. निथळलेल्या कुरडया घालून मंद आचेवर ३–४ मिनिटे परता.
  6. थोडेसे पाणी शिंपडून झाकण ठेवून एक वाफ काढा.
  7. वरून शेंगदाण्याचे कूट व कोथिंबीर घालून गरमागरम भाजी सर्व्ह करा. 

काही सुगरण टिप्स :-

  • ही भाजी नेहमी जेवणाआधी आयत्या वेळेला करा.
  • कुरडया जास्त वेळ भिजवू नका, नाहीतर भाजी लगदा होईल.
  • गव्हाच्या कुरडयांमुळे भाजीला हलकी आंबूस चव येते.
  • मुलांसाठी शेजवान चटणी किंवा मॅगी मसाला घालून चटपटीत बनवता येते.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

१) कुरडई कांदा भाजी कोणत्या कुरडईपासून करावी?

-  गव्हाच्या कुरडईपासून केली तर चव जास्त छान लागते.

२) ही भाजी मुलांच्या डब्यासाठी चालेल का?

-  हो, नूडल्ससारखी दिसते म्हणून मुलांना खूप आवडते.


३) कुरडई किती वेळ भिजवावी?

-  साधारण २०–३० मिनिटे पुरेसे असतात

     अशाप्रकारे अगदी कमी वेळात, कमी साहित्यात होणारी ही पारंपारिक भाजी नक्की करून पहा. आणि आवडली तर रेसिपी आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा. तुमच्याकडे ही भाजी करतात का ? आणि करत असतील तर तुमच्याकडे या भाजीला काय नाव आहे ? हे मला कमेंट करून नक्की कळवा.

जर तुम्हाला पारंपारिक महाराष्ट्रीयन रेसिपी आवडत असतील, तर आमची उंबर हंडी रेसिपी,पातोडी रस्सा रेसिपी,हुलग्याचे शेंगोळे आणि मासवडी रस्सा रेसिपी नक्की वाचा.

धन्यवाद 🙏

श्री स्वामी समर्थ






    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या