Ratalyachi Burfi recipe in marathi / रताळ्याची बर्फी

   Ratalyachi Burfi recipe in marathi / रताळ्याची  बर्फी  


Aajcha bet recipes च्या आजच्या लेखामध्ये पौष्टिक अशी रताळ्याची बर्फी कशी करायची याची रेसीपी दिली आहे. भारतात अनेक  भागात नवरात्रीचे  नऊ दिवस उपवास करतात. काहीजण एकच टाईम  फराळ करून उपवास करतात, तर काहीजण उपवासाचे अनेक प्रकारचे  पदार्थ  खाऊन  उपवास करतात. या  दरम्यान शरीराला थकवा येऊ नये म्हणून चांगला पौष्टिक आहार घेण्याकडे सर्वांचा कल असतो.
    या कालावधीत  बाजारात  रताळ्याची मोठ्या प्रमाणात आवक झालेली असते.रताळे हा पचण्यास हलका व  पौष्टिक असा पदार्थ असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडणारा असा पदार्थ आहे. नुसता उकडून सुद्धा खायला छान लागतो. रताळ्याची खीर, हलवा, पुरी, गोड काप असे अनेक पदार्थ केले जातात. आज मी रताळ्याची बर्फी   Ratalyachi Burfi recipe in marathi  कशी करावी याची सोपी रेसिपी सांगणार आहे.

Ratalyachi-Burfi-recipe-in-marathi
 Ratalyachi Burfi recipe in marathi


 साहित्य :-

३ मध्यम आकाराची  रताळी (१०० ग्रॅम)
२ वाट्या ओल्या नारळाचा कीस (१५० ग्रॅम)
२५० मि.ली. दूध
२५० ग्राम  साखर
३ चमचे साजूक तूप
काजू बदामाचे काप
वेलचीपूड आवडीनुसार

कृती :-
  1. रताळे स्वच्छ धुऊन ७/८ मिनिटे पाण्यात उकडून घ्यावेत.
  2. थंड झाल्यावर त्याची  साल काढून  चांगली स्मॅश करून घ्यावीत. 
  3. कढईत २ चमचे तूप गरम करून त्यात ओल्या नारळाचा कीस परतून घ्यावा. ३/४ मिनिटं  झाली की, स्मॅश केलेले रताळे, १ चमचा तूप व दूध घालून व्यवस्थित मिसळून गुठळ्या होऊ न देता मिश्रण परतावे.
  4. दूध आटेपर्यंत  मिश्रण चांगले परतून घ्यावे. मिश्रण कोरडे झाले की, साखर घालावी. साखरेचे पाणी सुकेपर्यंत सतत हलवत रहा. मिश्रणाचा गोळा होऊ लागला की, काजू बदामाचे काप घालून व्यवस्थित मिसळून घ्या. आवडीनुसार वेलची पूड घालावी. तूप लावलेल्या पसरट भांड्यात  बर्फीचे मिश्रण  व्यवस्थित थापून घ्या.
  5. ५/६ तासानंतर  रताळ्याची बर्फी हव्या त्या आकारात कापून घ्या.
ही रेसीपी सुदधा नक्की करून पहा :- Coconut barfi recipe in marathi / नारळाची बर्फी 

रताळे खाण्याचे आरोग्यदायी फायदे :-

* बाजारात रताळी वर्षभर उपलब्ध असतात. परंतु बरेच जणांना डाएट साठी सुद्धा रताळे खाऊ शकतो हे माहित नसते. रताळ्यामध्ये बीटा कॅरोटीन असते. त्यामुळे याच्या सेवनामुळे डोळ्यांना विटामिन ए म्हणजेच बीटा कॅरोटीन मिळते. यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
* रताळ्यातील कार्डिओप्रोक्टिव गुणधर्मामुळे हृदयरोग्यांसाठी किंवा होण्याची शक्यता असल्यास आहारात समावेश करणे योग्य राहील.
*शरीरातील नको असलेले विषारी घटक बाहेर पडावेत म्हणून आहारात रताळ्यांचा समावेश अवश्य करावा.
*अँटिइन्फ्लेमेटरी या गुणधर्मामुळे शरीरावरील सूज कमी करण्यासाठी रताळी अवश्य खावीत.
*बद्धकोष्ठता, अपचन व पोट दुखी यांसारख्या समस्यांसाठी रताळी खाणे फायदेशीर ठरते.
*रताळ्याचे नियमित सेवन केल्यामुळे सर्दी, खोकला, फ्लू सारख्या विषाणूजन्य आजार  होण्याचा धोका कमी होतो. म्हणजेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
*रताळ्या मध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी आहारात याचा समावेश करावा.
*उकडलेल्या रताळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो.म्हणून मधुमेही रुग्णांनी उकडलेले रताळे आहारात घ्यावे.
*पीसीओडीचा त्रास असलेल्या महिलांनी रताळी आहारात घ्यावीत.
* रताळ्या मध्ये पोटॅशियम असते. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. म्हणून उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या आहारात याचा समावेश करावा.
* किडनीचा त्रास असलेल्या रुग्णांनी रताळे खाणे टाळावे.

    ही पौष्टिक अशी  रताळ्याची बर्फी तुम्ही  नक्कीच करून पहा आणि आवडली तर जरूर आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा.

धन्यवाद 🙏

श्री स्वामी समर्थ
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या