Coconut barfi recipe in marathi / नारळाची बर्फी
Aajcha bet recipes च्या या लेखामध्ये रक्षाबंधन निमित्त महाराष्ट्रातील पारंपरिक असा एक चविष्ट आणि झटपट आणि कमी घरगुती साहित्यात करता येणारा मिठाई प्रकार म्हणजेच नारळाची बर्फी रेसीपी सोप्या पद्धतीने कशी करायची ते सांगणार आहे.विशेषत: सणावाराच्या दिवशी किंवा कोणत्याही खास प्रसंगी ही बर्फी बनवली जाते. खोबऱ्याची बर्फी बनवणे सोपे आहे आणि ती खूप चविष्ट लागते.राखी पौर्णिमा हा सण नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे.कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करून आनंद साजरा करतात.नारळाचे पदार्थ खाण्यासाठी करतात.आजकाल धावपळीच्या काळात विकतची मिठाई आणण्याकडे कल वाढला असला तरी काही सुगरण गृहिणी घरीच मिठाई बनवून आपले पाककौशल्य दाखवतात.चला तर मग ही नारळाची बर्फी Coconut barfi recipe in marathi पाहूयात.
![]() |
| Coconut barfi recipe in marathi |
नारळाची बर्फी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :-
२ वाट्या ताजे किसलेले खोबरे
१ वाटी साखर
१/२ वाटी दूध / दुधाची ताजी साय / ३ चमचे मिल्क पावडर
१/४ टीस्पून वेलची पूड
१ चमचा तूप
बदाम किंवा पिस्त्याचे काप (सजावटीसाठी)
- ताजा भरपूर पाणी असलेला नारळ घ्या. तो फोडून पाठीचा काळा भाग सुरीने अलगद काढून घ्या.म्हणजे बर्फी पांढर्या रंगाची होते.खोबर्याचे पातळ काप करून घ्या.मिक्सरला फिरवून घ्या.खोबरे वाटीने मोजून घ्या. म्हणजे साखरेचे प्रमाण ठरवता येईल.खोबर्याच्या निम्मी साखर किंवा गूळ वापरा.
- एक पसरत पॅन घ्या.म्हणजे मिश्रण सर्व बाजूने एकसारखे शिजेल.पॅनमध्ये चमचाभर तूप घाला.खोबर्याचे मिश्रण घाला. मिनिटभर चांगले परतून घ्या.आता साखर घाला.गॅसची आच मंद ठेवा. सर्व मिश्रण एकजीव झाले की सतत हलवत रहा.मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.
- आता मिश्रणात दूध किंवा साय मिसळा.यामुळे बर्फीची चव छान लागते.जास्त दिवस बर्फी टिकण्यासाठी दूध न घालता मिल्क पावडर घाला.दूध संपूर्ण आटेपर्यंत शिजवा.
- मिश्रणाचा घट्ट गोळा होऊ लागला की शेवटी वेलची पूड मिसळा.गॅस बंद करा.एका पसरट ताटाला तूप लावून त्यावर बर्फीचे मिश्रण पसरवा.एकसारखे पसरवून घ्या.त्यावर वरुन बदाम पिस्त्याचे काप टाकून सजवा.
- बर्फी थंड झाली की, सुरीने हव्या त्या आकारात बर्फीचे तुकडे करा.चविष्ट अशी नारळाची बर्फी खाण्यासाठी तयार आहे.
* नारळ ताजा वापरावा.जून झालेला खूप दिवसांचा ठेवलेला वापरू नये.
* पाठीचा काळा भाग काढून टाका. म्हणजे बर्फी पांढरीशुभ्र दिसते.
* गॅसची आच मंद ठेवा.वेळ लागतो पण खोबरे जळू न दिल्यास चव छान येते.
* मिल्क पावडर मुळे मिश्रण लवकर सुकते. आणि टेस्टी बर्फी बनते.
ही रेसीपी सुद्धा नक्की करून पहा :- ratalyachi barfi recipe in marathi
खोबऱ्याच्या बर्फीचे आरोग्यदायी फायदे :-
खोबऱ्याची बर्फी ही केवळ स्वादिष्ट मिठाई नाही तर ती आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. खोबऱ्यात विविध पोषक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. खालीलप्रमाणे खोबऱ्याच्या बर्फीचे काही महत्त्वाचे फायदे आहेत :-
ऊर्जेचा स्रोत :- खोबऱ्यामध्ये नैसर्गिक साखर आणि फॅट्स असतात जे त्वरित ऊर्जा देतात. त्यामुळे खोबऱ्याची बर्फी खाल्ल्याने तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळू शकते.
पचन सुधारते :- खोबऱ्यातील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठतेच्या त्रासातून सुटका होते.
हृदयासाठी फायदेशीर :- खोबऱ्यामध्ये असलेल्या हेल्दी फॅट्स हृदयासाठी चांगले असतात. यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते.
मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त :- खोबऱ्याच्या बर्फी च्या सेवनामुळे मधुमेही पेशंट्स ची साखर नियंत्रित राहते.
चांगले त्वचेचे आरोग्य :- खोबऱ्यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा चमकदार होते. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या आणि वयोमानाच्या खुणा कमी होतात.
हाडांची ताकत वाढते :- खोबऱ्यामध्ये असलेल्या कॅल्शियममुळे दात व हाडे मजबूत होतात।
इम्युनिटी बूस्ट :- खोबऱ्यात असलेले लॅरिक ऍसिड इम्युनिटी सुधारण्यासाठी मदत करते. हे विविध प्रकारच्या संसर्गांपासून शरीराचे संरक्षण करते.
तणाव कमी करणे :-खोबऱ्याची बर्फी खाल्ल्याने मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. यातील घटक मेंदूतील सेरोटोनिनची पातळी वाढवतात. ज्यामुळे मनःस्थिती सुधारते.
वजन नियंत्रण :- खोबऱ्यातील फायबरमुळे पोट भरलेले राहते, त्यामुळे अति खाण्याची शक्यता कमी होते आणि वजन नियंत्रणात राहते.
डायजेस्टिव्ह हेल्थ :- खोबऱ्यातील एंझाइम्स पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात. यामुळे अन्नाचे योग्य पद्धतीने पचन होते.
खोबऱ्याची बर्फी ही एक चविष्ट आणि पौष्टिक गोडाचा प्रकार आहे. जो महाराष्ट्रातील विविध घरांमध्ये सणावाराच्या काळात आवर्जून बनवली जाते. खोबऱ्याचे विविध आरोग्यदायी फायदे पाहता, ही बर्फी केवळ स्वादिष्ट नाही तर आरोग्यासाठी देखील लाभदायक आहे.त्यामुळे या राखीपौर्णिमेला ही बर्फी बनवा आणि आपल्या लाडक्या भावाला खूश करा....रेसीपी आवडली तर नक्की बनवा आणि मैत्रिणींना शेअर करा.
धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ .
Coconut barfi recipe in marathi / खोबर्याची बर्फी

0 टिप्पण्या