Aajcha Bet Recipes च्या या लेखामध्ये आपण खुसखुशीत, मऊ आणि पौष्टिक तिळाचे लाडू अगदी पारंपारिक पद्धतीने कसे करायचे ते पाहणार आहोत.
“तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला” असे म्हणत साजरा केला जाणारा मकर संक्रांत हा सण भारतीय संस्कृतीतील अतिशय महत्त्वाचा आणि आरोग्यदायी सण आहे.संक्रांत हा सण थंडीच्या दिवसात येत असल्यामुळे शरीराला उष्णतेची गरज असते. म्हणूनच या काळात तिळाचे लाडू, गुळपोळी, भोगीची भाजी असे उष्ण गुणधर्म असलेले पदार्थ करण्याची परंपरा आहे.घरच्या घरी बनवलेले तिळाचे लाडू हे केवळ चविष्टच नाहीत, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात.
आजकालच्या धावपळीच्या जीवनात बाजारातील लाडू खरेदी करण्याकडे कल वाढला असला, तरी घरच्या लाडूंना चव, शुद्धता आणि प्रेमाची सर येत नाही. म्हणूनच या लेखामध्ये मी तुम्हाला अजिबात कडक न होणारे, खमंग आणि टिकाऊ तिळाचे लाडू करण्याची सोपी कृती देत आहे.हे लाडू तुम्ही संक्रांत, रथसप्तमी तसेच हळदी-कुंकू समारंभासाठी नक्की तयार करू शकता.
तिळाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-
- ५०० ग्रॅम पांढरे तीळ (गावरान असल्यास उत्तम)
- ५०० ग्रॅम सेंद्रिय गुळ
- १ वाटी (१०० ग्रॅम) भाजलेल्या शेंगदाण्याची भरड
- २ चमचे पाणी
- २ चमचे साजूक तूप
- १ चमचा वेलची पूड
तिळाचे लाडू बनवण्याची कृती :-
- सर्वप्रथम पांढरे तीळ स्वच्छ धुऊन पूर्णपणे वाळवून घ्यावेत.
- जाड बुडाच्या कढईत मंद आचेवर तीळ हलवत-हलवत भाजून घ्यावेत. तीळ करपू देऊ नयेत. भाजलेले तीळ थंड करून घ्यावेत.
- शेंगदाणे खरपूस भाजून त्यांची सालं काढून जाडसर भरड करून घ्यावी.
- गूळ किसून किंवा बारीक चिरून घ्यावा.
- एका कढईत साजूक तूप घालून त्यात गूळ व पाणी घालावे. मंद आचेवर गूळ पूर्ण विरघळेपर्यंत ढवळत राहावे.
- गुळाचा पाक तयार झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी थंड पाण्यात पाकाचा थेंब टाकावा. थेंबाची गोळी तयार झाली तर पाक तयार आहे.
- तयार पाकात भाजलेले तीळ व शेंगदाण्याची भरड घालून पटकन एकजीव करावे आणि गॅस बंद करावा.
- वेलची पूड घालून मिश्रण गरम असतानाच हाताला थोडे तूप लावून लाडू वळून घ्यावेत.
- मिश्रण थंड झाल्यावर लाडू वळता येत नाहीत, त्यामुळे गरम असतानाच लाडू वळणे महत्त्वाचे आहे.
काही सुगरण टिप्स :- (Perfect Tilache Ladoo Tips)
- लाडू खमंग होण्यासाठी गावरान तीळ वापरणे उत्तम.
- तीळ भाजताना जाड कढई वापरावी.
- गुळाचा पाक जास्त शिजवू नये, नाहीतर लाडू कडक होतात.
- लाडू हवाबंद डब्यात ठेवल्यास ३–४ आठवडे टिकतात.
तिळाचे लाडू खाण्याचे काही आरोग्यदायी फायदे :-
- तिळ व गूळ शरीरात उष्णता निर्माण करतात.
- तिळाच्या सेवनामुळे हाडे व दात मजबूत होतात.
- रक्तातील साखर व रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
- लोहाचे प्रमाण वाढते, हिमोग्लोबिनसाठी उपयुक्त.
- केस मजबूत होतात व केसांची वाढ चांगली होते.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
१) तिळाचे लाडू कडक का होतात?
२) तिळाचे लाडू किती दिवस टिकतात?
३) तिळाचे लाडू कोणत्या तिळांपासून करावेत?
४) तिळाचे लाडू रोज खाऊ शकतो का?
५) मधुमेह असलेल्या रुग्णांनी तिळाचे लाडू खावेत का?
अशा प्रकारे तिळाचे लाडू रोजच्या आहारात योग्य प्रमाणात समाविष्ट केल्यास आरोग्य उत्तम राहते.या संक्रांतीला घरच्या घरी खुसखुशीत तिळाचे लाडू नक्की तयार करा आणि तुमचा अनुभव comment मध्ये जरूर सांगा.रेसिपी आवडल्यास share करायला विसरू नका 🙏

0 टिप्पण्या