Aajcha Bet Recipes च्या आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत सर्वांना आवडणारी, झटपट होणारी आणि आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त अशी कोथिंबीर थेपला रेसिपी. कोथिंबीर थेपला हा गुजराती पदार्थ असला तरी महाराष्ट्रातही नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा प्रवासात खाण्यासाठी मोठ्या आवडीने केला जातो. ताज्या कोथिंबिरीच्या सुगंधामुळे हा थेपला खूपच चविष्ट लागतो.
घरात उपलब्ध असलेल्या साध्या साहित्यापासून बनणारा हा थेपला पोटभरू असून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. चला तर मग पाहूया खुसखुशीत, मऊ आणि स्वादिष्ट कोथिंबीर थेपला कसा करायचा.
![]() |
| डब्यासाठी आणि नाश्त्यासाठी परफेक्ट कोथिंबीर थेपला रेसिपी |
कोथिंबीर थेपल्यासाठी लागणारे साहित्य
- गव्हाचे पीठ – २ कप
- बेसन – पाव कप
- बारीक चिरलेली कोथिंबीर – १½ ते २ कप
- हिरवी मिरची – १ ते २ (बारीक चिरलेली)
- आलं – १ टीस्पून (किसलेले)
- हळद – ½ टीस्पून
- काश्मिरी लाल तिखट – दीड टीस्पून (चवीनुसार)
- धणे-जीरे पूड – दीड टीस्पून
- हिंग – पाव टीस्पून
- मीठ – चवीनुसार
- ओवा – ½ टीस्पून
- तीळ – २ टेबलस्पून
- कसूरी मेथी – १ टीस्पून
- तेल – २ टेबलस्पून (कणिक मळण्यासाठी)
- दही – २ टेबलस्पून
- पाणी – आवश्यकतेनुसार
- तूप किंवा तेल – ठेपले भाजण्यासाठी
कोथिंबीर थेपला बनवण्याची कृती
- सर्वप्रथम एका मोठ्या परातीत गव्हाचे पीठ आणि बेसन एकत्र घ्या. त्यात मीठ, हळद, लाल तिखट, धणे-जीरे पूड,ओवा, तीळ,कसूरी मेथी आणि हिंग घालून सगळे कोरडे साहित्य नीट मिसळा.
- आता या मिश्रणात बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर, हिरवी मिरची आणि आलं घाला. कोथिंबीर जास्त प्रमाणात असल्यामुळे थेपल्याला छान रंग आणि चव येते.
- त्यानंतर दही आणि तेल घालून मिश्रण हलक्या हाताने एकत्र करा. दह्यामुळे थेपले मऊ राहतात आणि चवही वाढते.
- थोडे थोडे पाणी घालत मऊसर पण घट्ट कणिक मळून घ्या. कणिक फार सैल किंवा फार घट्ट नसावी. कणिक झाकून १०–१५ मिनिटे ठेवा.
- कणकेचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्या. प्रत्येक गोळा थोड्या पिठात घोळवून मध्यम जाडीचा गोल थेपला लाटा.
- गरम तव्यावर थेपला टाका. एका बाजूने थोडा भाजला की उलटवा. दोन्ही बाजूंनी थोडे तेल किंवा तूप लावून थेपला खुसखुशीत होईपर्यंत भाजा.
- अशाच प्रकारे सर्व थेपले तयार करून घ्या. गरमागरम कोथिंबीर थेपले तयार आहेत.
कोथिंबीर थेपला हिरवी कोथिंबीर-नारळ चटणी, दही, ताक किंवा लोणच्यासोबत खूपच छान लागतो. सकाळच्या नाश्त्यासाठी हा उत्तम कॉम्बिनेशन आहे. लहान मुलांसाठी थेपला करताना हिरवी मिरची कमी किंवा टाळावी. थोडेसे दूध किंवा तूप वापरल्यास ठेपले अधिक मऊ आणि चवदार होतात.हा थेपला डबा रेसिपी, नाश्ता, उपवासानंतरचा हलका आहार किंवा प्रवासासाठी उत्तम पर्याय आहे.
कोथिंबीरीपासून अजून एक healthy recipe नक्की वाचा - सांबार वडी रेसिपी
कोथिंबिरीचे आरोग्यदायी फायदे
- कोथिंबीर पचनशक्ती वाढवते.
- शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते.
- लोह, फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.
- वजन नियंत्रणासाठी उपयुक्त.म्हणूनच कोथिंबीर थेपला ही चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी मानली जाते.
काही उपयुक्त टिप्स -
- थेपले जास्त काळ मऊ राहण्यासाठी कणिक मळताना थोडेसे दूध घालू शकता.
- बेसनामुळे थेपल्याला छान चव येते, पण हवे असल्यास फक्त गव्हाच्या पिठाचाही वापर करू शकता.
- लहान मुलांसाठी मिरची कमी घालावी.
- प्रवासासाठी थेपले करताना दही वापरू नका.नाहीतर थेपले लवकर खराब होतील.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न – (FAQ)
1) कोथिंबीर थेपला मऊ कसा राहतो?
- कोथिंबीर थेपला मऊ राहण्यासाठी कणिक मळताना दही आणि थोडे तेल वापरणे महत्त्वाचे आहे. तसेच कणिक मळल्यानंतर १०–१५ मिनिटे झाकून ठेवली तर थेपले अधिक मऊ आणि चविष्ट होतात.
2) कोथिंबीर थेपला डब्यासाठी योग्य आहे का?
- होय, कोथिंबीर थेपला डब्यासाठी अतिशय योग्य आहे. हा थेपला अनेक तास मऊ राहतो आणि थंड झाल्यावरही छान लागतो. मुलांच्या टिफिनसाठी हा उत्तम पर्याय आहे.
3) कोथिंबीर थेपला प्रवासात नेता येतो का?
- होय, कोथिंबीर थेपला प्रवासासाठी उत्तम रेसिपी आहे. योग्यरीत्या भाजलेले थेपले १–२ दिवस खराब न होता टिकतात. सोबत लोणचं किंवा कोरडी चटणी दिल्यास चव वाढते.फक्त थेपला करताना दही वापरू नये.
4) कोथिंबीर थेपल्यामध्ये बेसन घालणे आवश्यक आहे का?
- बेसन घालणे आवश्यक नाही, पण थोडे बेसन घातल्याने थेपल्याला खास चव आणि खुसखुशीतपणा येतो. फक्त गव्हाच्या पिठातही हा थेपला बनवता येतो.
5) कोथिंबीर थेपला हेल्दी आहे का?
- होय, कोथिंबीर थेपला आरोग्यदायी रेसिपी आहे. कोथिंबिरीत फायबर, आयर्न आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे पचनासाठी आणि एकूण आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
तुम्हाला कोथिंबीर थेपल्यासोबत healthy chutney ideas हवे असतील तर जवसाची चटणी वाचा-येथे क्लिक करा,
आज आपण Aajcha Bet Recipes मध्ये पाहिली सोपी, झटपट आणि पारंपारिक अशी कोथिंबीर थेपला रेसिपी. घरच्या घरी कमी वेळात होणारा हा पदार्थ नक्की करून पाहा आणि तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. अशाच चविष्ट मराठी रेसिपीसाठी Aajcha Bet Recipes ला भेट देत रहा.
धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ

0 टिप्पण्या