Kavathachi barfi recipe in marathi / कवठाची बर्फी

 Kavathachi barfi recipe in marathi / कवठाची बर्फी

Aajcha bet recipes च्या या लेखामध्ये आज नरसोबाच्या वाडीची प्रसिद्ध कवठाची बर्फी (Kavathachi barfi recipe in marathi)  कशी करायची हे पाहणार आहोत. ज्याला (Wood Aapple) असेही म्हणतात.हे भारतातील एक लोकप्रिय फळ असून भगवान शंकराला ही अतिशय प्रिय आहे.महाशिवरात्रीला कवठ प्रसाद म्हणून खाण्याची परंपरा आहे. आणि म्हणूनच महाशिवरात्रीला म्हणजेच फेब्रुवारी,मार्च दरम्यान बाजारात मोठ्या प्रमाणात हे दिसतात.वरून कठीण असणारे हे फळ आतून आंबट गोड असे असते.त्याचा उपयोग चटणी, बर्फी,सरबत,मुरंबा,जेली व जॅमसाठी करतात.वर्षातून ठराविक काळातच मिळणारे हे कवठ आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर सुद्धा आहे.याचे फायदे सुद्धा या लेखात देत आहे.कवठाची स्वादिष्ट बर्फी बनवणे ही एक पारंपारिक गोड पदार्थाची रेसिपी आहे.जी तुम्हाला नक्कीच आवडेल.चला तर मग ही आंबट गोड चवीची बर्फी कशी  करायची ते पाहूया.

Kavathachi-barfi-recipe-in-marathi
Kavathachi barfi recipe in marathi

कवठाची बर्फी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :-

 २ मोठे कवठ (पिकलेले)

 २ कप साखर/ गूळ 

२/३ चमचे तूप

 १ चमचा वेलची पूड 

 ड्रायफ्रूट्स (बदाम, काजू, पिस्ता इ.आवडीनुसार

कवठाची बर्फी तयार करण्याची कृती :-

१) बर्फी करण्यासाठी बाजारातून कवठ विकत घेताना शक्यतो ते पिकलेले असावे. कवठ स्वच्छ धुऊन घ्या. याचे आवरण कठीण असल्याने नारळा प्रमाणे फोडावे. कवठाचा गर बाजूला काढून घ्या.

२) गरातील दोऱ्याप्रमाणे दिसणारा भाग काढून घ्या.यातील बिया आवडत नसतील तर काढू शकता.पण बर्फी खाताना खरपूस भाजलेल्या बिया तोंडात आल्यास छान लागतात. बिया काढणे किचकट वाटते.यासाठी किसणीच्या आतील बाजूवर कवठाचा गर अलगद घासून घ्या. म्हणजे बिया वेगळ्या होतात. राहिलेला गर वाटीने मोजा. म्हणजे साखरेचा किंवा गुळाचा अंदाज येतो. जेवढा गर असेल तेवढ्याच प्रमाणात साखर किंवा गूळ घ्या.कवठाच्या आंबटपणावर तुम्ही कमी अधिक करू शकता.

३) जाड बुडाच्या कढईत २/३ तूप गरम करा.तूप वितळल्यानंतर त्यात कवठाचा गर घाला.मिनिटभर परतून साखर किंवा किसून घेतलेला गूळ घाला.मिश्रण व्यवस्थित परतून घ्यावे.

४) मिश्रण शिजू लागले की, त्याचा रंग बदलतो. साखर किंवा गूळ वितळत असताना मिश्रण  पातळ होऊ लागल्यानंतर सतत ढवळत राहावे. मिश्रण थोडे घट्ट होईपर्यंत शिजवा.बर्फी चे मिश्रण कढई सोडू लागले की, म्हणजेच त्याचा गोळा होऊ लागला की, बर्फी साठी योग्य आहे हे समजावे.

६) शेवटी वेलची पूड आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्सचे काप घाला.आता हे मिश्रण गॅस बंद करून थोडे थंड होऊ द्या.

७) बर्फी सेट करण्यासाठी मिश्रण थंड झाल्यावर एका ताटाला तुपाचा हात लावून हे मिश्रण ओतून एकसारखे पसरवा.हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर ते कापून चौकोनी किंवा इच्छित आकाराचे तुकडे करा.

८) तुमची स्वादिष्ट कवठ बर्फी तयार आहे. ही बर्फी Kavathachi barfi recipe in marathi तुम्ही घरच्यांना नक्कीच बनवून द्या किंवा सणवाराला विशेष प्रसंगी करा.रेसिपी आवडल्यास आपल्या मैत्रिणींना शेअर करा.


ही रेसीपी सुद्धा नक्की करून पहा : लाल भोपळ्याचे घारगे / Gharge recipe


 कवठाचे आरोग्यदायी फायदे :-Benefits of eating Wood apple / Kavath

कवठ हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयोगी फळ आहे. याचा आहारात समावेश केल्याने  विविध आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.

1.पाचक फळ - कवठामध्ये मोठ्या  प्रमाणात फायबर असते. पचन क्रिया सुधारण्यासाठी  तसेच  बद्धकोष्ठता आणि पोटाचे आजार  दूर करण्यासाठी हे फळ खाणे गरजेचे आहे.

2. शरीरासाठी असणारे विषारी  घटक बाहेर टाकणे - कवठाचा आहारात समावेश  केल्याने शरीरातील विषारी पदार्थ  बाहेर टाकण्यास मदत होते.

3. इम्युनिटी वाढवते - कवठामध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.याच्या सेवनामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

4. हृदयासाठी फायदेशीर - कवठामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. रक्तदाब वाढू नये तसेच हृदय विकार टाळण्यासाठी कवठ खाणे उपयुक्त ठरेल.

5.डायबिटीज नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त - कवठाच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. म्हणजेच डायबीटीक पेशंट कवठ खाऊ शकतात॰

6.त्वचेसाठी उपयुक्त - कवठामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हे त्वचेला चमकदार ठेवण्यास आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.

7. हाडे मजबूत करते - कवठामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असल्याने  हाडांच्या मजबुतीसाठी कवठ खाणे आवश्यक आहेत. यामुळे हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदतच होईल.

8. वजन कमी होते. - कवठामध्ये कमी कॅलरीज असतात, वजन कमी  करण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांनी कावठाचा आहारात नक्की समावेश करावा.

9.अरुची, मळमळ, उलटी, जुलाब या विकारांवर कवठ सेवनाने रुची निर्माण होऊन ही लक्षणे कमी होतात.अंगावर पित्त उठले असल्यास कवठाच्या पानांचा रस अंगाला लावल्यास फायदा दिसून येतो

10.कवठाची बर्फी, चटणी अतिशय रुचकर, पित्तशामक, जिभेची चव वाढवणारी आहे. कवठाच्या पानांची भाजी किंवा पराठे करावेत. कवठाची पाने सुवासिक व वातशामक असतात. कवठ हे पिकलेलेच खावे, कच्चे कवठ खाल्ल्याने सर्दी, खोकला होऊ शकते.

9. कवठामध्ये थंडावा देणारे गुणधर्म असतात, ज्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत याचा उपयोग करण्यास उत्तम ठरते.

Kavathachi barfi recipe in marathi / कवठाची बर्फी

धन्यवाद.

श्री स्वामी समर्थ 🙏



टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या